SSA Contractual Employees Regularisation : मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दिनांक 22 जुलै रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली होती.
या बैठकीत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार दिनांक 22 ऑगस्ट रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
समग्र शिक्षा (SSA) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत तसेच विविध प्रश्नासंदर्भात MPSP राज्य प्रकल्प संचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली असून, समितीस या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
समग्र शिक्षा मधील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील लेटेस्ट शासन निर्णय येथे पाहा
गुड न्यूज! रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मंजूर व रिक्त पदांवर समायोजन - शासन निर्णय पाहा
गुड न्यूज! रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मंजूर व रिक्त पदांवर समायोजन - शासन निर्णय पाहा
सदर समितीने या करार कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत समायोजन व अन्य प्रश्नाबाबत अन्य राज्यामध्ये या योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मानधन व अन्य सेवाशर्ती याबाबत अभ्यास करून शासनास एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील कंत्राटी कर्मचा-यांच्या संदर्भात