Daily Wage Employees Regular : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे कार्यरत असलेल्या दैनिक वेतनावरील कर्मचा-यांचे महानगरपालिकेतील मंजूर व रिक्त पदावर समावेशन करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मंजूर व रिक्त पदांवर समावेशन - नगर विकास विभागाने घेतला महत्वपूर्ण निर्णय
राज्यातील विविध नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील दिनांक ११.३.१९९३ ते दिनांक २७.३.२००० या कालावधीत नियुक्ती होवून कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबत मा. मंत्रीमंडळाने निर्णय घेतला असून, त्याबाबतचे आदेश यापूर्वीच (सन 2019) मध्ये निर्गमित करण्यात आले आहे.
त्यानुसार गट-क आणि गट-ड मधील १९० कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदावर तसेच दैनिक वेतनावरील कार्यरत महानगरपालिकेतील आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदांवर समावेशन करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला जमा होणार, पाहा तारीख - लगेच करून घ्या हे काम
करार कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय!
आता आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी सादर केलेल्या शासन पत्रान्वये दि.२७.३.२००० पूर्वी दैनिक वेतनावर नियुक्त असलेले महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेतील चौकीदार या मंजूर व रिक्त पदांवर समावेशन करण्याबाबत खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात आले आहे.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान किती आणि कधीपासून मिळणार? येथे पाहा महाराष्ट्र शासनाचा आदेशरोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय! थकीत रक्कमेसह 12 % व्याजदराने रक्कम मंजूर, शासन निर्णय पाहा
समावेशन करण्याबाबत अटी व शर्ती
- दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील आकृतीबंधातील चौकीदार या मंजूर व रिक्त पदांवर समावेशन करण्यात यावे.
- समावेशनाच्या दिनांकापासून संबंधित कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठता, निवृत्तीवेतन इत्यादि विषयक लाभ अनुज्ञेय राहतील.
- समावेशनामुळे त्यांना पूर्वीच्या सेवा कालावधीतील वेतन, भत्ते व अन्य अनुषंगिक वित्तीय लाभ यांची थकबाकी अनुज्ञेय असणार नाही.
- सदरची मंजुरी देताना ३५% आस्थापना खर्चाची बाब "विशेष बाब म्हणून शिथील करण्यात येत आहे.
- पुढील आर्थिक वर्षात महानगरपालिकेचा आस्थापना खर्च ३५% च्या मर्यादेत येण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्याची जबाबदारी आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांची राहील.
- संबंधित दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांच्या समावेशनानंतर त्यांच्या वेतनाकरीता शासनाकडून कोणताही निधी महानगरपालिकेस मंजूर करण्यात येणार नाही.
समावेशन करण्यात आलेल्या सर्व दैनिक वेतनावरील नियमित सेवा सर्वप्रयोजनार्थ त्यांच्या समावेशनाच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी तसेच संबंधित दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल केला असल्यास तो बिनशर्त मागे घेण्यात यावा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने समावेशनाचे आदेश निर्गमित करण्यापूर्वी उक्त दोन्ही बाबींसंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांकडून बंधपत्र घेण्यात यावे व खातरजमा करावी.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया येथे पाहा