‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना - सुधारित निकष, या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणार 4500 रुपये

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली असून, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. (अर्ज करण्याची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे.)

या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणार 4500 रुपये

Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana

या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळणार आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी - आवश्यक पात्रता

  • लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी.
  • राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला आता नवीन बदलानुसार 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचे बँक खाते आवश्यक आहे. आणि बँकेला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  • तसेच यामध्ये कुटुंबातील केवळ एका अविवाहितेलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • त्याशिवाय लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने केलाला अर्ज आवश्यक आहे.
  2. लाभार्थ्याचे आधार कार्ड आवश्यक आहे.
  3. लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  4. यासोबतच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास नवीन बदलानुसार ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
  5. याशिवाय बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत असणे आवश्यक असून, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड असणे गरजेचे आहे.
  6. या योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही लागणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल अँपद्वारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तसेच ऑफलाईन अर्जाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा आता अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

योजनेसाठी भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी त्याची पोच पावती दिली जाणार आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now