Aadhar Card Bank Link : दि. 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांनी आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा करण्यात आला असून, उर्वरित महिलांना दि 17 ऑगस्ट पर्यंत लाभ मिळणार आहे.
लाडक्या बहीण योजनेसाठी ज्या बँकेला आधार नंबर कार्ड (Bank Seeding) लिंक आहे, त्याच बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येत आहे.
आता आपण ATM मध्ये बँक खाते आधारशी लिंक कसे करावे? आणि आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? हे कसे चेक करू शकतो ते पाहूया..
Check Bank Account(Aadhar Linked) - Aadhaar - uidai
Aadhar Card Link Bank : बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही? हे तपासण्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Bank Seeding Status - Click here to find your Bank Seeding Status. द्वारे चेक करू शकता. त्यासाठी येथे भेट द्या.
ATM मध्ये बँक खाते आधारशी लिंक कसे करावे?
बँक खातेदार त्यांचे आधार कार्ड नंबर - बँक खात्याशी लिंक करण्यासाठी बँकेच्या ATM मध्ये भेट देऊन बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करता येऊ शकते, त्यासाठी खालील स्टेप Follow करा.
- स्टेप 1: तुमचे ATM Card स्वाइप करा आणि तुमचा पिन नंबर टाका.
- स्टेप 2: 'सेवा' (Services) मेनूमध्ये, 'नोंदणी' (Registration) पर्याय निवडा .
- स्टेप 3: आता 'आधार नोंदणी' पर्याय निवडा.
- स्टेप 4: खाते प्रकार (बचत/चालू Savings/Current) निवडा आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- स्टेप 5: आधार क्रमांक पुन्हा एंटर करा आणि ओके बटणावर क्लिक करा.
- स्टेप 6: तुम्हाला तुमच्या बँक खात्यासोबत तुमच्या आधारच्या यशस्वी सीडिंगबद्दल एक पुष्टीकरण संदेश मिळेल.
प्रत्यक्ष बँकेत जाऊन आधार कार्ड नंबर लिंक करा
प्रत्यक्ष बँकेत जाऊन तुम्ही संबंधित फॉर्म भरून आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता.