RTE Admission Waiting List Children 2024 25 : 'आरटीई' अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतील लॉटरीमध्ये निवड झालेल्या मुलांना पहिल्या टप्प्यामध्ये प्रवेश निश्चित करण्याची संधी देण्यात आली होती, ती मुदत आता संपली असून, अजूनही राज्यातील 40 हजाराहून अधिक जागा रिक्त आहे, आता प्रतीक्षा यादीतील मुलांना या रिक्त असणाऱ्या जागांवर प्रवेश मिळणार आहे, प्रतीक्षा यादीतील (Waiting List) मुलांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आरटीई' अंतर्गत आता प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी, 40 हजाराहून अधिक जागा रिक्त...
आरटीई (RTE) प्रवेशासाठी राज्यातून 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 93 हजार 32 विद्यार्थ्यांची RTE प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती.
आतापर्यंत पहिल्या नियमित फेरीमधून 61 हजार 197 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत.
आता राज्यातील 72 हजार 276 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असून प्रवेश प्रक्रियेच्या उर्वरित 40 हजार जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
दिनांक 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील मुलांची यादी व आपल्या अर्जाची स्थिती तुम्ही RTE पोर्टलवर चेक करू शकता.
प्रतीक्षा यादी जिल्हानिहाय येथे पाहा
आतापर्यंत 90 लाखांहून अधिक पात्र महिलांना लाभ; उर्वरित महिलांना कधी? येथे पाहा