Majhi Ladki Bahin Yojana : आतापर्यंत 90 लाखांहून अधिक पात्र महिलांना लाभ; उर्वरित महिलांना कधी? येथे पाहा

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 3 हजार रुपये जळगाव जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यावर यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 96 लाखांहून अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित पात्र महिलांनाही दि 17 ऑगस्टपर्यंत लाभ मिळणार आहे.  अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (AditiTatkare) यांनी दिली आहे.

या महिलांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेची रक्कम जमा

majhi-ladki-bahin-yojana

दि. 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांनी आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा करण्यात आला असून, उर्वरित महिलांना दि 17 ऑगस्ट पर्यंत लाभ मिळणार आहे.

लाडक्या बहीण योजनेसाठी ज्या बँकेला आधार नंबर कार्ड (Bank Seeding) लिंक आहे, त्याच बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येत आहे. 

बँकेला आधार लिंक झाल्यानंतर लाभ मिळणार

Aadhar Card Link Bank  : ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक (Aadhaar Card) जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे.

बँकेला आधार लिंक आहे किंवा नाही कसे पाहायचे?

Check Bank Account(Aadhar Linked) - Aadhaar - uidai

लाडकी बहीण’ योजना - आवश्यक पात्रता : सुधारित निकष पाहा 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम बालेवाडी येथे होणार

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत (दि. १७) शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे.

'आरटीई' जिल्हानिहाय प्रतीक्षा यादी येथे पाहा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now