NHM Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत निघाली भरती; 25 ते 75000 पर्यंत मिळेल पगार…

NHM Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग पुणे जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत भरती बाबत जाहीर प्रकटन करण्यात आले असून, या भरतीमध्ये 25 ते 75000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

NHM Bharti 2024

१५ व्या वित्त आयोगांतर्गत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकिय अधिकारी या पदांच्या थेट मुलाखत पदभरतीबाबत प्रकटन जाहीर करण्यात आले आहे.

तसेच पुणे ग्रामीण, कटक मंडळे अंतर्गत एमबीबीएस व बीएएमएस (MBBS and BAMS) वैद्यकिय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे.

NHM अंतर्गत नवीन जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती सुरू

या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार - मुख्यमंत्री

संवर्गनिहाय रिक्त जागांसाठी एमबीबीएस वैद्यकिय अधिकारी मासिक मानधन ६००००/- व बीएएमएस वैद्यकिय अधिकारी मासिक मानधन २५०००/- व कामाधारित मोबदला (PBI) १५०००/- इतके आहे.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत मूळ जाहिरात येथे पाहा

आशा स्वयंमसेविका लेटेस्ट अपडेट पाहा

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्टकांसाठी मोठी अपडेट!

पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीकरीता येताना आपली शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक असणारी कागदपत्रे मुळ व एक झेरॉक्स कॉपी सोबत आणावी. सदर कागदपत्रांमध्ये जातीचा दाखला/पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

राज्यातील या कर्मचाऱ्यांना 'विशेष' नैमित्त‍िक रजा

आनंदाची बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू

तरी सदर मुलाखती संवर्गनिहाय उमेदवारांकडून दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी पदे भरे पर्यंत आयोजित करण्यात येत आहे. संवर्गनिहाय अतिरिक्त उमेदवार उपलब्ध झाल्यास त्यांचा समावेश प्रतिक्षा यादीमध्ये करण्यात येईल. व रिक्त होणाऱ्या पदांवर समुपदेशनाने नियुक्ती करण्यात येईल. सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिनांकास मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.

सविस्तर जाहिरात पाहा

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका महिला कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट

मुलाखतीकरीता उपस्थित राहणेकरीता तपशिल खालीलप्रमाणे

  • स्थळ :- ४ था मजला, शिवनेरी सभागृह
  • वेळ :- सकाळी ११.३० वाजता
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.zppune.org/pgeImp_info.aspx

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now