सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट! कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन पेन्शन योजनेत 'हे' लाभ

Unified Pension Scheme  : सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यास दिनांक 24 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नेमका कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार पाहूया.. 

कर्मचाऱ्यांना नव्या पेन्शन योजनेत 'हे' लाभ मिळणार

Unified Pension Scheme

  1. खात्रीशीर पेन्शन (Assured pension) : या योजनेत सेवानिवृत्तीपूर्वी किमान 25 वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या 50 टक्के रक्कम मिळण्याची हमी दिली जाते.
  2. कौटुंबिक निवृत्तीवेतन (Family Pension) : मृत्यू झाल्यास, निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंबाला त्यांच्या मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळेल.
  3. किमान निवृत्तीवेतन (Minimum pension) : ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना किमान 10 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीनंतर दरमहा 10 हजार रुपये मिळण्याची हमी देते.

'सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनांमध्ये काही बदल करण्याची मागणी केली होती, त्यानुसार केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव टी.व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने विविध संघटना आणि जवळपास सर्व राज्यांसोबत १०० हून अधिक बैठका घेतल्या. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि जागतिक बँकेसह सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतर समितीने युनिफाइड पेन्शन योजनेची शिफारस केली आहे. या युनिफाइड पेन्शन योजनेला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने  मंजुरी दिली असून भविष्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. 

MSRLM (उमेद) अंतर्गत विविध पदांसाठीची जाहिरात येथे पाहा

लाडकी बहिण योजनेतील 31 जुलै नंतरच्या महिलांना पैसे कधी जमा होतील? पाहा डेडलाईन..


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तब्बल विविध 31 पदांच्या 90 जागांसाठी जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील कंत्राटी कर्मचा-यांची जिल्हानिहाय सेवा जेष्ठता यादी येथे डाऊनलोड करा - डायरेक्ट लिंक 

 




Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now