‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 40 लाख महिलांनी नोंदणी पूर्ण केली आहे. 1 कोटी 7 लाख बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. आता 31 जुलै नंतरच्या महिलांना पैसे कधी जमा होतील? याबाबतची डेडलाईन पाहूया..
ज्या महिलांनी 31 जुलै नंतर नोंदणी केली आहे, आणि ज्या महिलांनी अद्यापही नोंदणी केली नाही, त्यांनी नोंदणी करून घ्यावी, अशा सर्व पात्र महिलांना एकाचवेळी जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे रुपये 1500 प्रमाणे 4500 रुपये बँकेत जमा करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील ३१ जुलै पर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
- ३१ जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरु आहे.
- जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त अर्जांचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँके कडे पाठवली जाते.
- ही सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे बँकेला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. त्यासाठी आता लगेच चेक करा
अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात '7' महत्वाचे लेटेस्ट अपडेट जाणून घ्या..