शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाची महत्वपूर्ण बैठक संपन्न; बैठकीतील निर्णय पाहा

School Safety and Security : शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शालेय शिक्षण मंत्री मा. दिपकजी केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

School Safety and Security

विद्यार्थिनींसोबत घडणाऱ्या दुर्देवी घटना रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून या उपाययोजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. 

शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन संदर्भात अपडेट येथे पाहा

करार कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय!

आशा स्वयसेविका ,गटप्रवर्तक संदर्भात येथे पाहा

यावेळी महिला व बालविकास विभागाच्या वतीने खालील सूचना मांडल्या

  • बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच टास्क फोर्स मार्फत शाळा व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून वेळप्रसंगी अचानक भेटी देऊन बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
  • संपूर्ण राज्यभर विविध विभागाच्या शाळा, संस्थांमधील , गुड टच बॅड टच बाबत अभ्यासक्रम तयार करावा.
  • नागरी व ग्रामीण भागात बालिका पंचायत स्थापन कराव्यात.
  • बालकांच्या वयोगटानुसार ॲनिमेटेड व्हिडिओज तयार करून बालकांमध्ये तसेच पालकांमध्ये जाणीव जागृती करावी. 
  • शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये माता समितीच्या मार्फत सर्व स्तरावर बालकांच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात जाणीव जागृती करावी.

शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले, या समितीने नागरिक, शिक्षण आणि विद्यार्थिनींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सूचना असल्यास त्या ऐकून तातडीने अधिक उपाययोजना सुचवाव्यात. सर्व शाळा आयुक्तालयाशी जोडाव्यात. प्रत्येक शाळेला किमान एक इंटरॲक्टीव्ह टीव्ही देऊन त्या माध्यमातून विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यावे. आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात यावा. चांगला आणि वाईट स्पर्श ओळखायला शिकवावे. यासाठी माता बालक संघाचीही मदत घ्यावी.

लाडकी बहिण योजनेसंदर्भात, राज्य सरकारचे बँकांना दिले 'हे' निर्देश

महिला बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या, अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत घडणाऱ्या घटना अतिशय दुर्देवी आहेत. मोठ्या विद्यार्थिनींना दिले जाणारे प्रशिक्षण अल्पवयीन विद्यार्थिनींना समजणे कठीण जाईल, यासाठी ॲनिमेटेड फिल्मच्या माध्यमातून त्यांना शिकविण्यात यावे. गुड आणि बॅड टच बाबत अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली.

समग्र शिक्षा मधील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील लेटेस्ट शासन निर्णय येथे पाहा

शालेय शिक्षण विभागाचा लेटेस्ट शासन निर्णय येथे पाहा

शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, शालेय शिक्षण प्रधान सचिव आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प आयुक्त कैलास पगारे यावेळी उपस्थित होते. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.अनुप यादव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, एससीईआरटी चे संचालक राहूल रेखावार दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

MSRLM (उमेद) अंतर्गत विविध पदांसाठीची जाहिरात येथे पाहा

शिक्षक भरती संदर्भात राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now