Shikshak Bharti : शिक्षक भरती संदर्भात राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, याचा राज्यातील शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. सविस्तर वाचा.
राज्यातील शिक्षकांना मिळणार दिलासा, शिक्षक भरती संदर्भात राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!
सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे.
परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्हयात काम करावे लागते, तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते.
शिक्षण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाचा शासन निर्णय पाहा
शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाची महत्वपूर्ण बैठक संपन्न; बैठकीतील निर्णय पाहा
तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शुन्य सेवाजेष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. यास्तव शिक्षकांना स्वतः च्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करुन देणे आवश्यक आहे.
समग्र शिक्षा मधील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील लेटेस्ट शासन निर्णय येथे पाहा
जेणेकरुन, विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन, शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निक्षितच मदत होईल.
शालेय शिक्षण विभागाचा लेटेस्ट शासन निर्णय येथे पाहा
या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रूटी दूर करुन जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करुन शिक्षक भरतीची उचित कार्यपध्दती सूचविण्याकरीता शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
राज्यात जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली अभ्यास गट गठीत करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया येथे पाहा
समितीची कार्यकक्षा
- प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करुन विभाग वा जिल्हा स्तरावर शिक्षक भरतीकरीता आयुक्त (शिक्षण) यांनी सूचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करुन सुयोग्य कार्यपध्दतीची शिफारस करणे.,
- अभ्यास गटाने आपला अहवाल १ महिन्यात शासनास सादर करावा.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठी भरती सुरू, अर्ज येथे सादर करा