MahaHsscBoard Exam Time Table 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
दरवर्षी (इ.१२वी) परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुकमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.
लाडकी बहीण योजना : आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? येथे चेक करा
त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ! वित्त विभागाने जारी केला शासन निर्णय
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा.
तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी व इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे.
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार, दि.२३.०८.२०२४ पर्यंत secretary.stateboard@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी : https://mahahsscboard.in/mr