या कर्मचाऱ्यांच्या जुलै व ऑगस्ट या महिन्यांचे वेतन, 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी व महागाई भत्ता फरक निधी मंजूर, शासन निर्णय जारी

ICDS Employee Salary : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे.

icds employee salary

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक-एक्स-१ मुख्य लेखाशिर्ष २२३६- पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अधिकारी, कर्मचारी यांचे माहे जुलै व ऑगस्ट, २०२४ या महिन्यांचे वेतन, ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी व महागाई भत्ता फरक अदा करण्यासाठी वितरित करण्यास एकुण रु.१०७.५५ कोटी (रुपये एकशे सात कोटी पंचावन्न लक्ष फक्त) इतका निधी वितरित व खर्च करण्यास दिनांक 13 ऑगस्टच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

लाडक्या भावाकडून रक्षाबंधानाची ओवाळणी; या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणार 4500 रुपये 

रोजंदारी तत्वावरील कामगारांना मिळाला न्याय!

सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे राहतील. त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला आहे. त्यानुसार आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मागदर्शक सूचनांचे तसेच यासंदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित निकष, वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटेकोर पालन करावे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now