अखेर! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ! वित्त विभागाने जारी केला शासन निर्णय...

 State Government Employees DA Hike : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्याने वाढ करण्यात आली असून, आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के करण्यात आला आहे. दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना 50 टक्के प्रमाणे महागाई भत्ता (DA) देण्याचा महत्त्वाचा शासन निर्णय वित्त विभागाने 10 जुलै 2024 रोजी जारी केला आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ!

State Government Employees Da Hike

राज्य शासकीय व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या इतर पात्र दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाने आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.

त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना आता  46 % वरून 50 % प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. हा महत्वाचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अपडेट पाहा

आशा स्वयंसेविका संदर्भात अपडेट येथे पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अपडेट येथे पाहा

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा

सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी, 2024 मिळणार लाभ

शासनाने असे आदेश दिले आहे की, दिनांक 1 जानेवारी, 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्याचा दर 46 % वरून 50 % करण्यात यावा. 

सदर महागाई भत्तावाढ दिनांक 1 जानेवारी, 2024 ते दिनांक 31 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत रोखीने देण्याबाबत आदेश निर्गमित केले आहे.

महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय येथे पाहा

निवृत्तिवेतनधारक- कुटुंब निवृत्तिवेतनधारकांचा महागाई वाढ शासन निर्णय पाहा

गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now