Ladki Bahin Yojana Aadhar Card link : लाडकी बहीण योजनेचा दूसरा हप्ता अर्थात 31 जुलै नंतरच्या महिलांना दिनांक 31 ऑगस्ट रोजी बँकेत पैसे जमा करण्यात येणार आहे, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे आधार कार्ड बँकेला लिंक असणे आवश्यक आहे, आज आपण दोन महत्वाची माहिती पाहणार आहोत, 1) आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? आणि 2) आधार कार्ड बँकेला ऑनलाईन लिंक कसे करायचे याबाबतची सविस्तर माहिती पाहुया.. (Video मध्ये स्टेप बाय स्टेप माहिती खाली पाहा)
1) आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? असे चेक करा
- सर्वप्रथम आधार च्या खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर Bank Seeding Status - Click here to find your Bank Seeding Status यावर क्लिक करा.
- आता तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाका आणि कॅपचा कोड टाकून लॉगइन करा.
- तुमच्या आधार ला लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो OTP बॉक्समध्ये टाका.
- आता "लॉगइन" वर क्लिक करा.
- आता याद्वारे, तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधारशी लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर, या खात्याचे सक्रिय आहे की नाही, हे देखील स्क्रीन वर दिसेल.
आता जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तिथे Active असे स्टेट्स दिसेल, जर बँकेला आधार लिंक नसेल तर खालील पद्धतीने आधार कार्ड बँकेला तुम्ही ऑनलाईन लिंक करू शकता.
लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन यादी येथे पाहा
2) आधार कार्ड बँकेला ऑनलाईन लिंक कसे करायचे?
- सर्वप्रथम गुगल वर NPCI असं सर्च करा
- त्यानंतर https://www.npci.org.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- आता Consumer या ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यांनंतर Bharat Aadhar seeding या ऑप्शन वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक पेज नवीन पेज ओपन होईल.
- तिथे Request for Aadhaar ला seeding या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला ज्या बँकेचा खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचं नाव निवडा आणि Fresh Seeding वर क्लिक करा
- बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे.
- नंतर टर्म अँड कंडिशन बॉक्स मध्ये ओके करा
- आता कॅपच्या कोड टाका आणि सबमिट करा.
- शेवटी एक OTP येईल तो टाका.
लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन यादी येथे पाहा
लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा येथे सादर करा
बालसंगोपन संगोपन योजनेतून दरमहा 2250 रूपये मिळवा- त्यासाठी अर्ज येथे करा
आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? लगेच येथे चेक करा
या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणार 4500 रुपये
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासंदर्भात लेटेस्ट शासन निर्णय पाहा