सरकारी योजना! मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार; बालसंगोपन योजनेसाठी अर्ज येथे करा, अर्जाचा नमूना व (GR) पाहा

Bal Sangopan Yojana 2024 : राज्यामध्ये बालकांच्या संगोपनासाठी बाल संगोपन ही सरकारी योजना राबविली जाते, या योजनेमध्ये दरमहा कुटुंबाला 2 हजार 250 रुपये इतके अनुदान बालकांच्या संगोपनासाठी देण्यात येते, या योजनेची सविस्तर माहिती पाहूया..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना 2024

balsangopan yojana

बाल संगोपन या योजनेसाठी वय वर्ष 0 ते 18 वर्षातील बालकांचा समावेश होतो, ही योजना आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना म्हणून ओळखण्यात येते, 

बालसंगोपन योजनेमध्ये 'या' बालकांना समावेश

ज्या मुलांचे वय वर्ष 0 ते 18 वर्ष आहे, त्या वयोगटातील पुढील बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.

  • अनाथ बालके
  • ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागत नाही अशी बालके
  • असे बालक जे दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके
  • कोविड कालावधीमध्ये दोन अथवा एक पालक गमावलेले बालके
  • एक पालक असलेली व family Crisis मध्ये असलेली बालके 
  • मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग (Abandonment), अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके 
  • कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके
  • एच.आय.व्ही. (HIV) ग्रस्त/बाधित बालके
  • तीव्र मतिमंद बालके
  • बहुविकलांग (Multiple disability) बालके 
  • ज्यांची दोन्ही पालक (आई/वडील) दिव्यांग (अपंग) आहेत अशी बालके
  • पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील (Crisis situation मधील) बालके
  • शाळेत न जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले)

बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे बालसंगोपन अर्जाच्या फाईल सोबत साक्षांकित करून जोडावी. अर्ज नमुना पुढे दिला आहे.

  • पालकांचे आधार कार्ड
  • बालकांचे आधार कार्ड / जन्मदाखला / बोनाफाईड
  • रहिवाशी पुरावा
  • आई/वडील मृत असल्यास मृत्यू चे प्रमाणपत्र
  • उत्पनाचा दाखला
  • कुटुंबाचा एकत्रित फोटो
  • बालक दिव्यांग (मतीमंद,बहुविकलांग) असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
  • दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो
  • पालकांचे बँक किंवा पोस्टाचे पासबुक झेरॉक्स
  • निकषानुसार इतर कागदपत्रे उदा. आजर पण असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र, HIV प्रमाणपत्र इ.

मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार

या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून बालकांच्या संगोपनासाठी पालकास प्राप्त होणाऱ्या परिपोषण अनुदानात ₹११००/- वरून ₹२२५०/- वाढ करण्यात येवून व संस्थेस देण्यात येणारे प्रतिबालक प्रतिमहा अनुदानात ₹१२५/- वरून ₹२५०/- इतकी वाढ करण्यात येवून बाल संगोपन योजनेअंतर्गत परिपोषण अनुदानात एकुण १२५००/- इतकी वाढ दि.१७.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. 

MSRLM (उमेद) अंतर्गत विविध पदांच्या 394 जागांसाठी अर्ज येथे करा

लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा येथे सादर करा

बालसंगोपन योजना अर्ज नमुना (Form ) PDF Marathi

बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज करू शकता यासाठी पुढील लिंक वर बालसंगोपन अर्जाचा नमुना फॉर्म दिला आहे. तो डाउनलोड करून घ्यावा.

बालसंगोपन योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?

बालसंगोपन योजनेचा अर्ज (Form) तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (ICDS) या कार्यालयात जमा करावा. त्यानंतर बाल सरंक्षण समिती तुमचा अर्ज पडताळणी झाल्यांनतर अंतिम मंजुरी देईल त्यांनतर तुमच्या बँकेत दरमहा परिपोषण अनुदान होईल.

अधिक माहितीसाठी : बालसंगोपन योजना अर्ज व शासन निर्णय येथे पाहा

संपर्क - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (ICDS)

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now