राज्यातील या कामगारांच्या समस्या तातडीने सोडवणार – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

WORKER NEWS

मुंबई ते मोरा दरम्यान सुरु असलेल्या फेरी बोटीचे (लॉन्च) ७५ टक्के प्रवासी कमी झाल्याने फेरी बोटीवाल्यांच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याबाबत संबंधितांनी सविस्तर प्रस्ताव द्यावा. या बोटीवरील कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यातील ‘या’ कर्मऱ्यांच्या संदर्भात मंत्रालय येथे महत्वाची बैठक संपन्न

अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता - शासन निर्णय पाहा

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विधिमंडळात - प्रश्न

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची अपडेट!

(दि 15 मार्च) रोजीचा शासन निर्णय रद्द होणार?

आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती

मुंबई ते मोरा दरम्यान फेरी बोटीवरील कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याबाबत सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

शासनाकडे अद्याप फेरी बोट चालक कंपन्याच्या अडचणी संदर्भात कुठलाही प्रस्ताव किंवा निवेदन आलेले नाही,मात्र संबंधितांनी त्यांच्या समस्याबाबत निवेदन किंवा प्रस्ताव सादर करावा, त्यावर विचार करुन तत्परतेने उपाययोजना केल्या जातील. या विषयाबाबत तातडीने बैठक घेऊन अडचणी सोडविल्या जातील, असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, प्रवीण दरेकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

जुनी पेन्शन योजना संदर्भात सरकारकडून खुलासा

आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत

महाज्योती मार्फत मिळणार मोफत टॅब, 6 GB इंटरनेट डाटा; ऑनलाईन अर्ज येथे करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now