राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत मा. सदस्य सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती, यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
जोगेश्वरी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणार – आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील जोगेश्वरी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास तातडीने मंजुरी देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य सतीश चव्हाण यांनी जोगेश्वरी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळण्यासाठी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता - शासन निर्णय पाहा
राज्यातील आरोग्य विभागाची रिक्त पदे 100 टक्के भरण्यात येत आहे
राज्यातील आरोग्य विभागाची रिक्त पदे १०० टक्के भरण्यात येत आहेत. आदिवासी, डोंगराळ भागातही सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्यात येत असल्याचे मंत्री प्रा. सावंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी सदस्य अभिजात वंजारी, प्रा.राम शिंदे, महादेव जानकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विधिमंडळात - प्रश्न
आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत पावसाळी अधिवेशनात सरकारकडून खुलासा
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागणार