मोठी बातमी ! 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची अंतिम यादी 'येथे' होणार जाहीर; लॉटरीची यादी येथे पहा..

शिक्षण हक्क 'आरटीई' योजनेंतर्गत राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी 9 हजार 217 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 399 जागांसाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले असून, निवड झालेल्या बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यांची RTE Lottery Result 2024 25 PDF यादी RTE पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे.

'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची अंतिम यादी 'येथे' होणार जाहीर; लॉटरीची यादी येथे पहा

RTE Lottery Result 2024 25 PDF

यंदा दिनांक ९ फेब्रुवारीच्या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान दिल्यामुळे मा. न्यायालयाने RTE प्रवेशाची प्रक्रिया ही पूर्वीप्रमाणेच राबविण्याचे आदेश दिले, त्यामुळे पुन्हा दिनांक १७ मे २०२४ पासून RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली. 

त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे दिनांक ७ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरटीई २५ टक्के प्रवेशाची सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली.

आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरीचा अंतिम निकाल यादी दिनांक 18 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे, निवड यादी जाहीर केल्यानंतर निवड झालेल्या पालकांना संदेश SMS पाठवण्यात येणार आहे, मात्र एसएमएस वर विसंबून न राहता तुम्ही आर टी ई पोर्टलवर तुमच्या अर्ज क्रमांक नुसार अर्जाचे स्थिती  चेक करू शकता. 

आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरी अंतिम निकाल यादी येथे पाहा

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा - RTE Online Application Status

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पालक आपल्या अर्जाची स्थिती RTE Portal वरील Application Status या टॅब वर पाहू शकता.

स्टेप १ : Application Wise Details - अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)

स्टेप २ : तिथे HOME पेजवर - Application Wise Details - अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा.

स्टेप ३ : आता Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती पहा.

RTE Admission Portal Official Website Link : https://student.maharashtra.gov.in/

'आरटीई' लॉटरी कशा प्रकारे काढली जाते पाहा

आरटीई लॉटरी निकाल 'लाईव्ह' कार्यक्रम येथे पाहा'

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now