"आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी" या माध्यमातुन महाराष्ट्रातील संपूर्ण पालखी मार्गावर आता पर्यंत आरोग्य विभागातील ६३६८ इतक्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत एकुण 10,908 वारक-यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आलेली आहे.
'आरोग्यांची वारी, पंढरीच्या दारी' या घोषवाक्यासह, आषाढी वारी २०२४ (Ashadhi Vari 2024) करीता मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मा. ना. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा. प्रा. श्री. डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली, देहु-आळंदी ते पंढरपुर (Dehu-Alandi to Pandharpur) तसेच महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरपूर करीता हजारो पालख्या, दिंडया पंढरपूर कडे प्रस्थान करत आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा तसेच शिक्षण, जनजागृती, प्रसिद्धी करण्यात येत आहे.
आरोग्य विभागातील ६३६८ इतक्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा
महाराष्ट्रातील मानाच्या विविध पालख्याच्या पालखी मार्गावर देण्यात येणा-या आरोग्य विषयक सेवा, सुविधांची वैशिष्टये खालीलप्रमाणे
- आरोग्य विभागाकडून एकुण ६३६८ इतक्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत महाराष्ट्रातील विविध पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार वारकऱ्यांना मोफत तपासणी व औषधोपचार करुन आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
- एकूण २५८ तात्पुरत्या आपला दवाखान्याच्या माध्यमातुन (प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर १ याप्रमाणे) मोफतसेवा पुरविण्यात येत आहे.
- एकुण ७०७ (१०२ व १०८) रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर २४x७ पध्दतीने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
- पुणे परिमंडळ पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन पालखी बरोबर एकुण ४ आरोग्य पथके सुसज्ज
- रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यन्त सोबतराहणार आहेत.
आयुक्त, संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान पदावर नवीन अधिकारी अधिक वाचा.
- एकुण २१२ आरोग्यदुतांमार्फत (बाईक अॅम्बुलन्स) पालखी मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
- ५८८५ औषधी किटचे विविध दिंडी प्रमुखांना/मालकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
- एकुण १३६ हिरकणी कक्षांची स्थापना पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेच्या ठिकाणीतसेच पालखी तळावर करण्यात आलेली आहे.
- महिलावारकऱ्यांसाठी एकुण १३६ त्रीरोग तज्ञ पालखी मार्गावरील रुग्णालयामध्येकार्यरत ठेवण्यात आलेले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या संदर्भात
- पालखी मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले, एकुण ८७ अतिदक्षता विभाग उभारण्यात आलेले आहेत.
- पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी करण्यात येत असून, पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या किचनची देखील तपासणी करण्यात येणार आहे.
- पालखी मार्गावर १८६ टँकरव्दारे शुध्द पाणीपुरवठा करण्यात येत असून पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी धुर फवारणी, पाण्याच्या सर्व खोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैव कचरा विल्हेवाट करण्यात येत आहे.
- पालखी मार्गावर आरोग्य विषयक जनजागृती करीता समाजमाध्यमात, डिजीटल, प्रिंट, होर्डिंग्ज तसेच ९ चित्ररथ मार्फत जनजागृती, प्रचार व संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
- श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा दिनांक 20 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झाले सदर सोहळ्यास जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची टीम वाहनास व औषधेसह तैनात.