राज्यातील शाळांची संचमान्यता 2024-25 च्या संदर्भात शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण संचानालय कार्यालयाकडून दोन महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. (परिपत्रक लिंक खाली दिलेली आहे.)
महत्वाची अपडेट! संचमान्यता 2024-25 च्या संदर्भात 'दोन' महत्वाचे परिपत्रक निर्गमित
दिनांक १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत.
सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक ३०.०९.२०२४ रोजीच्या आधार वैध पट विचारात घेवून संचमान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ 2 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
बालसंगोपन योजनेचा अर्ज नमूना येथे पाहा
सन २०२४- २०२५ च्या संचमान्यता विहित कालावधीत करण्यासाठी 'सरल' प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक ३०.०९.२०२४ पुर्वी पूर्ण करुन घेण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.
'सरल' प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांचे आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पुर्ण करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचानालय यांनी दिले आहे.
शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन
शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाची महत्वपूर्ण बैठक संपन्न; बैठकीतील निर्णय पाहा