अंगणवाडी सेविका, आशा सेविका 'याही' लाडक्या बहिणींना गौरी-गणपती सणापूर्वी प्रोत्साहन भत्ता लाभ मिळणार?

'मुख्यमंत्री : माझी लाडकी बहिण' या योजनेचा टप्पा 2 दिनांक 31 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येत आहे, या योजनेचा अर्ज भरुन देण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक लाभार्थीमागे 50 रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुषंगाने आता मा. आ. धिरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी यांच्याकडे मागणी केली आहे की, अंगणवाडी सेविकांना आणि महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी ज्यांची मदत घेण्यात आली त्या यंत्रणांना थकित रक्कम अदा करून त्यांना दिलासा द्यावा.

Anganwadi Asha Sevika allowance

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योज़नेसाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका 'याही' लाडक्या बहिणींना प्रति लाभार्थी देय प्रोत्साहन भत्ता गौरी-गणपती सणापूर्वी द्यावा, अशी विनंती मा. आ. धिरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी केली आहे.

टप्पा 2 : लाडक्या बहीण योजनेचा लाभ या 50 लाख महिलांना येथे पाहा

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या संदर्भात मोठा आणि महत्वाचा निर्णय पाहा

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजने अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु.50/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन निर्णय पाहा

लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन यादी येथे पाहा

आधार कार्ड बँकेला लिंक करायचे आहे का? मग येथे ऑनलाईन पद्धतीने करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now