'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे येत्या ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोजनाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विविध प्रशासकीय विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.
नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या विशेष कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचे थेट वाटप करण्यात येणार आहे. बँकेला आधार कार्ड लिंक असणाऱ्या आणि अर्ज मंजूर असणाऱ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व नागरी भागातील ५० हजार महिला या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी 'हे' आवश्यक काम लगेच करा
लाडकी बहीण ऑनलाईन, ऑफलाईन यादी येथे पाहा
मुलींना मोफत उच्च शिक्षण - परिपत्रक येथे पाहा
बँकेला आधार कार्ड येथे ऑनलाईन लिंक करा
मुख्य कार्यक्रमस्थळी उचित व्यवस्था व सुरक्षा, या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांची आसन व्यवस्था, प्रसार माध्यमांची व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था आदींसह शासनाच्या विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत श्रीमती बिदरी यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या.सर्व विभागाने नियोजित जबाबदाऱ्या काटेकोर व वेळेत पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले.