मुलींना मोफत उच्च शिक्षण! आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य विभागाचे 'हे' परिपत्रक सोबत ठेवा!

मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याबाबतचे महत्वाचे परिपत्रक तसेच शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहे, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य या विभागाने एक महत्वाचे परिपत्रक नुकतेच काढले आहे.

मुलींना मोफत उच्च शिक्षण! आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य विभागाचे 'हे' परिपत्रक सोबत ठेवा!

free girl education

त्यानुसार आर्थिकदृष्टया मागास (EBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत हे परिपत्रक काढण्यात आले असून, सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत, या परिपत्रकाची डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे. 

लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन यादी येथे पाहा

लाडकी बहीण - आधार कार्ड बँक खात्याशी येथे ऑनलाईन लिंक करा

यापूर्वी शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवीस (UG) प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया मागास (EBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाम मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने संबंधित महाविद्यालयांना पुढील प्रमाणे कळविण्यात आले आहे.

मुलींना मोफत उच्च शिक्षण - परिपत्रक येथे पाहा

  • सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे. त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा.
  • ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा.
  • शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन, संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे,

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now