आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होईल - महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

dialysis-city-scan-center

उपजिल्हा  रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करीत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार असून  रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.  आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होत आहेत, असे प्रतिपादन यावेळी अदिती तटकरे यांनी केले.

आदिती तटकरे यांच्या हस्ते डायलिसिस आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन

Dialysis CityScan Center

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले.  यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यामध्ये विविध जिल्ह्यांतर्गत भरती जाहीर, जाहिरात येथे पाहा

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

राज्यातील या मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात

यावेळी  तटकरे पुढे म्हणाल्या की,डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटर या सेवांमुळे रुग्णांच्या पैशांची बचत होणार आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात अनेक अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.  लवकरच माणगांव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने  प्रयत्न करण्यात येणार आहे.

गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा

माणगांव हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे त्यामुळे अशा इतर आरोग्य सेवा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रिश्ना डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे डायलिसिस व सिटी स्कॅन सेंटर सुरू झाले आहे.ही सेवा सुरू होत असल्याने रुग्ण व नागरीकांना लाभ होईल.

27 वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत - विधनपरिषदेत प्रश्न

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now