'आरटीई' प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज; विद्यार्थ्यांची निवड यादी कधी जाहीर होणार?

RTE Admission Lottery Result : आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी 'लॉटरी' नुकतीच राज्यस्तरावर काढण्यात आली, मात्र प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची निवड यादी कधी जाहीर होणार? सविस्तर जाणून घ्या.

‘आरटीई’ची सोडत जाहीर

RTE Admission Lottery Result

यंदा दिनांक ९ फेब्रुवारीच्या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान दिल्यामुळे मा. न्यायालयाने RTE प्रवेशाची प्रक्रिया ही पूर्वीप्रमाणेच राबविण्याचे आदेश दिले, त्यामुळे पुन्हा दिनांक १७ मे २०२४ पासून RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली. 

त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे दिनांक ७ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरटीई २५ टक्के प्रवेशाची सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली.

'आरटीई' प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज

राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 9 हजार 217 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 399 जागांसाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहे, रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज असल्याने राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येत आहे.

DistrictRTE VacancyTotal Applications
Ahmadnagar30237407
Akola20144895
Amravati23966655
Aurangabad445115141
Bhandara7631955
Bid21495831
Buldana25815394
Chandrapur15163064
Dhule11372890
Gadchiroli484883
Gondiya9033031
Hingoli8051851
Jalgaon30337810
Jalna19205168
Kolhapur30323899
Latur18655763
Mumbai48109902
Mumbai1455--"--
Nagpur692020350
Nanded26018953
Nandurbar419882
Nashik527114842
Osmanabad10132410
Palghar47733662
Parbhani15643149
Pune1771448164
Raigarh40087385
Ratnagiri812777
Sangli19012368
Satara18263549
Sindhudurg293163
Solapur24645291
Thane1133919592
Wardha12153020
Washim9532049
Yavatmal19764768
Total105399242913

विद्यार्थ्यांची निवड यादी कधी जाहीर होणार?

आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरीचा अंतिम निकाल यादी कधी जाहीर होणार? SMS कधी मिळणार? आता लवकरच ही प्रतीक्षा संपणार असून दोन दिवसात RTE पोर्टलवर यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, याचे कारण असे की, सोडतीनुसार RTE प्रवेशासाठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी मा. न्यायालयाचा आदेश आल्यास दिनांक १२ जूननंतर प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर पालकांना संदेश SMS मिळणार आहे आणि मग तालुकास्तरावर समितीकडून कागदपत्र पडताळणी होऊन प्रवेश निश्चित होतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालयाकडून देण्यात आली आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरी अंतिम निकाल यादी येथे पाहा

आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरीचा अंतिम निकाल यादी लवकरच जाहीर होणार असून, निवड झालेल्या पालकांना संदेश SMS पाठवण्यात येणार आहे, मात्र एसएमएस वर विसंबून न राहता तुम्ही आर टी ई पोर्टलवर तुमच्या अर्ज क्रमांक नुसार अर्जाचे स्थिती  चेक करू शकता. 

आरटीई २५ टक्के प्रवेश लॉटरी अंतिम निकाल यादी येथे पाहा

'आरटीई' लॉटरी कशा प्रकारे काढली जाते पाहा

आरटीई लॉटरी निकाल 'लाईव्ह' कार्यक्रम येथे पाहा'

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागाची 'टेलिमानस' सेवा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now