दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागाची 'टेलिमानस' सेवा विनामूल्य उपलब्ध!

'Telemanus' Service Available for 10th-12th Students : राज्यातील इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे, त्यामुळे आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागाची टेलिमानस सेवा सुरु करण्यात आली आहे.

'Telemanus' Service Available for 10th-12th Students

इयत्ता 10 वी आणि 12 वी या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. 

राज्यात आजपर्यंत 70 हजार व्यक्तींनी समुपदेशनाचा लाभ घेतला आहे. यामध्ये नैराश्य, ताणतणाव, निद्रानाश, दु:खी मन:स्थिती, पौगंडावस्थेतील मानसिक स्थित्यंतरे आदी समस्यांचे निराकारण केले जाते. 

राज्याच्या टेलिमानस कार्यक्रमाच्या उपयोगीतेमध्ये देशात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आयुक्त, आरोग्य सेवा यांनी कळविले आहे.

टेलिमानस या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक 14416 (भ्रमणध्वनीसाठी) आणि 18008914416 (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या सेवेचा गरजू विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, सायक्याट्रिक नर्स आणि सायक्याट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत असून या सेवेसाठी मनोविकृतीतज्ज्ञदेखील नियुक्त आहेत. 

आरटीई (RTE) लॉटरीचा निकाल Live येथे पाहा

MHT CET 2024 LIVE निकाल (नवीन तारखा) येथे पाहा

आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

पशुसंवर्धन विभागात तब्बल 5250 जागांसाठी जाहिरात पहा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now