राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट, नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

rain alert
  1. 🔴🌧️रेड अलर्ट : भारतीय हवामान विभागाने आज  दि २ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वाजे पर्यंत, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्याचा काही भागात वादळीवारे तसेच वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय नियंत्रण कक्ष; मुंबई
  2. 🔴🌧️रेड अलर्ट : भारतीय हवामान विभागाने आज  दि ५ सप्टेंबर २०२४ सकाळी ८.०० वाजे पर्यंत, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा जिल्ह्याचा काही भागात वादळीवारे तसेच वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. 
  3. 🌧️⚡ऑरेंज अलर्ट: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पुढील ३-४ तासात काही तुरळक भागात ताशी ३० ते ४० प्रतितास वादळीवारे तसेच वीजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये 12 जनावरे मृत्युमुखी पडली असून 21 घरांची अंशतः पडझड झाली आहे.

शालेय शिक्षण विभाग मंत्रालयाचा मोठा खुलासा

  •  १२ जनावरांचा मृत्यू ; २५ घरांची पडझड
  • पाऊस थांबताच शेती व अन्य पंचनामे करणार
  • किनवट, हिमायतनगरमध्ये अधिक पाऊस
  •  प्रकल्प भरले ; धरणाखालील नागरिकांनाही इशारा
जिल्ह्यामध्ये 24 तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. दहा वाजेपर्यंत 136 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी, उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर अधिक आहे. किनवट पाठोपाठ  हिमायतनगर, माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड या तालुक्यांमध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे. नागरिकांनी नाले, ओढे, तलावाच्या भागात जाण्याचे टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 'इतके' रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या संदर्भात मोठा आणि महत्वाचा निर्णय पाहा

आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पाटबंधारे, महसूल व पोलीस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. एनडीआरएफचे पथक तैणात असून कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या सतर्कतेने मुदखेड तालुक्यात पुलावर अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी 10 वाजता पासून रविवारी रात्री 7 वाजेपर्यंत पावसाची कुठे दमदार अतिवृष्टी तर कुठे रिपरिप सुरू आहे. सकाळी 10 पर्यंत आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातील 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये 65 मिली लिटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. किनवट सारख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिराही पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now