Teacher Transfer 2024: जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्या अनुषंगाने यापूर्वीचा बदलीबाबत शासन निर्णय अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी दिनांक 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारीत धोरण निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरणात बदल!
सुधारित जिल्हाअंतर्गत बदली धोरणानुसार आता अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष व अन्य मुद्यांबाबतच्या व्याख्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा आता धरण्यात येणार आहे.
बदली अधिकार प्राप्त शिक्षक : बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक बदलीस पात्र असणार आहे.
अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणुन घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्टकांसाठी मोठी अपडेट!
राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू होणार
यापूर्वी (सन 2022) ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना, निवदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच या संदर्भात मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये रिट याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून व मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत अभ्यासगट नेमण्यात आला होता.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..
सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये आता सुधारणा करण्यात आली असून, याबाबत नवीन सुधारित शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निक्षित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे. (शासन निर्णय)
'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक