One State One Uniform : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 'एक राज्य एक गणवेश' लागू योजना लागू केली असून, आता गणवेश परिधान करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यानुसार विद्यार्थ्याना गणवेश परिधान करावा लागणार आहे, वेळापत्रक पाहा.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन गणवेश!
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच, स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेशाची रचना निश्चित करण्यात आली आहे.
मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित व स्काऊट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील.
तसेच, स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा. स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी (मंगळवार, गुरुवार, शनिवार) स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात याव्यात.
मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील शाळा दि.१५ जून, २०२४ पासून सुरू होत आहेत. महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या (स्काऊट गाईड) गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावे. असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
एक राज्य एक गणवेश - वेळापत्रक पाहा
RTE विद्यार्थ्यांची निवड यादी कधी जाहीर होणार?
नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 995 जागांसाठी जाहिरात पाहा
जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर; जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक