MPSC Rajyaseva Prelims 2024 : सरकारी नोकरीची संधी! 524 जागांसाठी MPSC मध्ये भरती!

MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 524 रिक्त पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, ऑनलाईन करण्याची अंतिम मुदत दिनांक 7 जून 2024 पर्यंत आहे.

MPSC Rajyaseva Prelims 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Rajyaseva Prelims 2024) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा  शनिवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग नवीन जाहिरात - रिक्त पदांचा तपशील

पदे व संख्या

राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

  • उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे)
  • सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे)
  • गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे)
  • सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे),
  • सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे)
  • उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ  (एकूण 07 पदे)
  • सहायक कामगार आयुक्त, गट - अ (एकूण 02 पदे),
  • सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट - अ (एकूण 01 पद)
  • मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब  (एकूण 19 पदे)
  • सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे)
  • सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे)
  • उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे)
  • कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे)
  • सरकारी कामगार अधिकारी, गट - ब   (एकूण 04 पदे)
  • सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04  पदे)
  • उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7  पदे)
  • सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52  पदे)
  • निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे)
  • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा - महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे)

  • वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे)

  • जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).
  • विविध पदांसाठी महाभरती जाहीर, लगेच करा ऑनलाइन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ऑनलाईन अर्ज - महत्वाच्या तारखा

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक  7 जून 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 7 जून 2024 रोजी 23:59 पर्यंत
  • भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 9 जून 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  10 जून 2024 रोजी आहे.

शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी, 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने या मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते.

सविस्तर तपशील पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर अधिकृत जाहिरात डाउनलोड करा.

मूळ जाहिरात - शुद्धिपत्रक 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात मूळ जाहिरात : MPSC New Advertisement 2024 PDF Download

महाराष्ट्र लोकसेवा आयोग वेबसाईट : www.mpsc.gov.in

जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

पशुसंवर्धन विभागात तब्बल 5250 जागांसाठी जाहिरात पहा

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 'दोन' महत्वाचे शासन निर्णय

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now