Family Pension : अतिवार्धक्यामुळे किंवा शारीरिक व्याधी आणि दूर्धर आजारांमुळे दूर्बलता - विकलांगता अक्षमताग्रस्त निवृत्तिवेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन किंवा कुटुंब निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करणेसाठी आता राज्य शासनांकडून कार्यपद्धती निश्चित आली आहे. आता पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे.
निवृत्तिवेतन व्यवहारासाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!
राज्यातील ज्या निवृत्तिवेतनधारकांना किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारकांना अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश (Dementia), स्मृतिनाश (Alzheimer), अर्धांगवायू (Paralysis), रुग्णशय्याधिनता (Bedriddenness) किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता (Debility) विकलांगता (Inability) अक्षमता (Disability) आहे.
त्यामुळे त्यांच्या निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तीशः हाताळणे शक्य होत नाही, अशा निवृत्तिवेतनधारकांसाठी कुटूंब निवृत्तिवेतनाचे प्राधिकारपत्र (Family Pension Authorization Letter) ज्या व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या वैवाहीक जीवनसाथीदार व्यक्तीच्या सोबत अनुज्ञेय असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेचा प्राधान्याने वापर करण्याची तरदूत आहे.
हे ही वाचा: आशा सेविका आणि आरोग्य सेविकांसाठी लेटेस्ट अपडेट
मात्र वरील परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्तिवेतनधारकांचे किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारकांचे वैवाहिक जीवनसाथीदार (यथास्थिती पती / पत्नी) देखील अशाच प्रकारच्या शारीरिक मानसिक दुर्बलता - विकलांगता अक्षमता इत्यादिंमुळे निवृत्तिवेतन विषयक संयुक्त बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार हयातच नसतील, अशा निवृत्तिवेतनधारकांना, कुटूंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार हाताळण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) विहित कार्यपध्दती किंवा ' प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९० अंतर्गत पालक (Guardian) नियुक्ती या दोन सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येणार आहे.
राज्य वेतनस्तर सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक
राज्यातील (SEBC) उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यातील या विभागातील भरती प्रक्रिया स्थगित!
भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा विहित कार्यपध्दती
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 'अभिकर्ता बँकांद्वारा शासकीय निवृत्तिवेतनाचे संवितरण' यासंदर्भात अभिकर्ता बँकांना मुख्य परिपत्रकाद्वारे (Master Circular द्वारे) वेळोवेळी विस्तृत मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या जातात. अलीकडे असे मुख्य परिपत्रक दिनांक ०१ एप्रिल, २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निर्गमित करण्यात आलेले आहे.
त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य परिपत्रकाद्वारे वृद्ध / आजारी / विकलांग / अक्षम निवृत्तिवेतनधारकांद्वारे निवृत्तिवेतनाचे आहरण याबाबत परिच्छेद ७, ८ आणि ९ अन्वये शासन निर्णयात दिल्याप्रमाणे कार्यपध्दत्ती विहित करण्यात आलेली आहे. (सविस्तर मार्गदर्शक सूचना येथे पाहा)
कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी दिले महत्वाचे निर्देश
आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण - ग्राम विकास विभागास विभागाचे शासन शुद्धीपत्रक