Government Circular Pay Scale: राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत यापूर्वी सुधारणा करण्यात आली होती, मात्र पूर्वीच्या वेतनस्तरातील वेतनापेक्षा सुधारित वेतनस्तरामध्ये वेतन कमी निश्चित होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे वित्त विभागाने दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे, आता यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा नवीन शासन निर्णय दिनांक 12 जून रोजी वित्त विभागाने जारी केला आहे.
राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे, सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत शासन शुध्दीपत्रक काढण्यात आले आहे.
दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या परिपत्रकातील क्र.२ च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत " १.१.२०१६ रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर " या वाक्याऐवजी " १.१.२०१६ रोजी व तद्नंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर " असे वाक्य वाचण्यात यावे.
क्र.२ च्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दि.१.१.२०१६ रोजी च्या पुढे " किंवा तद्नंतर " या शब्दांचा समावेश करण्यात यावा. असे शासन शुध्दीपत्रक वित्त विभागाने निर्गमित आहे.
शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ नुसार पूर्वीच्या वेतनस्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी विकल्पाचा नमुना देण्यात आला आहे. (शासन निर्णय व विकल्पाचा नमुना पाहा )
निवृत्तिवेतनधारकांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!
कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी दिले महत्वाचे निर्देश
आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण - ग्राम विकास विभागास विभागाचे शासन शुद्धीपत्रक