Asha Sevaika Latest News : आशा सेविका व आरोग्य सेविकांनी आपल्या विविध मंगण्यासंदर्भात आझाद मैदान येथे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा सेविकांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन तसेच प्रसूती विषयी लाभ, गटविमा योजना लागू करावी किंवा 15 हजार रुपये वार्षिक विम्याचा हप्ता (Annual Insurance Premium) मिळावा आणि दर महिन्याच्या १० तारखेपूर्वी वेतन मिळावे, महापालिकेच्या आरोग्यसेविकांच्या रिक्त जागांवर आशासेविकांची नियुक्ती करावी, आदी विविध मागण्यांसाठी आशा सेविका (Asha workers) आणि आरोग्य सेविकांनी आझाद मैदान येथे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी पुकारलेल्या आनंदोलसंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र या बैठकीमध्ये जवळपास दीड ते दोन तास झालेल्या चर्चेमध्ये कोणताच सकारात्मक तोडगा न निघल्यामुळे आशा सेविका व आरोग्य सेविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक!
आशा सेविका आणि आरोग्य सेविकांच्या मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
गेल्या कित्येक महिन्यांपासून आशा सेविका आणि आरोग्य सेविका मानधन वाढीसाठी धरणे, आंदोलने करत आहेत. महायुती सरकार केवळ खोटी आश्वासने देत वेळकाढूपणा करत आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळे आशा सेविका व आरोग्य सेविकाना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (Shivani Wadettiwar) यांनी Tweet करत आशा सेविका आणि आरोग्य सेविकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्याकडून सर्वेक्षण
मोठी बातमी! राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून मुंबईत
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्याचा वाढीव मोबदला वितरित!
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु. ३२८६७.९९ लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून, एप्रिल २०२४ ते जून, २०२४ या ३ महिन्याचे रु.२४८१६.९२ लक्ष इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय ५ जून २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
'आरटीई' 25 टक्के अंतिम निकाल लॉटरीची यादी जाहीर
निवृत्तिवेतनधारकांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!