जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी (Narendra Modi) जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या #लखपती_दीदी (Lakhpati Didi) संमेलनात लखपती बनलेल्या दीदींना पंतप्रधानांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लखपती दीदी' योजना नक्की काय आहे? पाहूया..
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी रिमोट दाबून याप्रसंगी राज्यातील ४८ लाख बचत गटांना २५०० कोटी रुपयांच्या रिव्हॉल्व्हिंग फंडचे वितरण तसेच २६ लाख बचत गटांना ५ हजार कोटींच्या बँक कर्जाचे वितरण केले. तसेच बचतगटाच्या माध्यमातून लखपती बनलेल्या दीदींना पंतप्रधानांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आनंदाची बातमी!गटप्रवर्तकांच्या मानधनात भरीव वाढ! मंत्रिमंडळ बैठकीत ‘19’ मोठे निर्णय पाहा
लाडकी बहीण योजनेच्या या तारखे नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू -
'लखपती दीदी' योजना नक्की आहे तरी काय?
आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे हे लखपती दीदी (Lakhpati Didi) या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेतून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांना स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळेल. एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
MSRLM (उमेद) अंतर्गत विविध पदांच्या 394 जागांसाठी अर्ज येथे करा
- या योजनेसाठी वय 18 ते 50 वयोगटातील महिला लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करु शकतात.
- घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसलेली महिला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असलेली महिला लखपती दीदी साठी अर्ज करु शकते.
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना 'Self Help Group' व्यवसाय योजना तयार करावी लागेल. आणि व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर, बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवेल. सरकारकडून अर्जाची छाननी आणि पडताळणी नंतर अर्ज मंजूर होतो. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
लखपती दीदी अधिकृत वेबसाईट : https://lakhpatididi.gov.in/hi/how-do-i-become-a-lakhpati-didi/