साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज येथे करा

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व  उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ (Sahitya Ratna Demokratyar Anna Bhau Sathe Scholarship Scheme) अर्ज योजनेकरिता  मागविण्यात आले आहेत.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज येथे करा

srdabs-scholarship

मोठी बातमी! आरटीई 25 टक्के प्रवेशाबाबतचा अध्यादेश रद्द; मा. उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय!

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ (Scholarship) योजनेकरिता २४ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या मुंबई शहर-उपनगरच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरित करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्रावीण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रक, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतींमध्ये आपले अर्ज पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), मुंबई- गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर २४ जुलै, २०२४ पर्यंत करावेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now