Teacher Transfer GR 2024: जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण ग्राम विकास विभागाने जारी केलेल्या दिनांक २३ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार नुसार निश्चित करण्यात आलेले असून,आता या GR मधील मुद्दा क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात आली तसा शासन निर्णय दिनांक १२ जून २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण - ग्राम विकास विभागास विभागाचे शासन शुद्धीपत्रक
दिनांक २३ मे २०२३ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४ मध्ये "वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील" असे नमूद करण्यात आले होते.
आता या ऐवजी खालील सुधारणा करण्यात आली आहे.
"वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे प्रकरणपरत्वे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने निकाली काढण्यात येतील." असे वाचावे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविताना विविध गंभीर स्वरूपाचे आजार, दिव्यांग शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, घटस्फोटित महिला शिक्षक, वयाची 53 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक, स्वातंत्र्य सैनिकांचा (मुलगा, मुलगी, नातू, नात), शिक्षकांचे जोडीदार विशेष गंभीर आजाराने ग्रस्त असलेले शिक्षक यांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.
वित्त विभागाने जारी केले शासन शुध्दीपत्रक
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आनंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण - शासन निर्णय (2024)