NHM Contractual Employees Regularisation : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याच्या दिनांक १४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरु करण्यात आली असून, लवकरच NHM कर्मचारी नियमित होणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मागील १५ ते २० वर्षांपासून शासन सेवेत कायम होण्याच्या आशेपोटी तुटपुंज्या मानधनावर आरोग्य सेवेचा भार उचलणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व परिचारिकांच्या कष्टाचे आता 'चिझ' होणार आहे.
कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार १० वर्षे आणि त्याहून अधिक काळ सेवेत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजनाच्या माध्यमातून आरोग्य विभागात सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आरोग्य यंत्रणेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी १० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी सेवेत आहेत. त्यांच्या सेवेची माहिती, आरोग्य विभाग तयार करत आहे. जिल्हानिहाय याची सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या रिक्त पदांमधील भरतीयोग्य पदांत यापुढे ७० टक्के पदे सरळसेवेने तर ३० टक्के पदे या कर्मचाऱ्यांतून समायोजनाने भरली जाणार आहेत.
केंद्र सरकारने सन २००५ साली राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरु केले. या अभियान अंतर्गत आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंतची पदे कंत्राटी तत्वावर भरली जातात. ग्रामीण आरोग्य सेवेला या अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा मिळाला आहे.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी!
कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व इतर लाभ लागू होणार
NHM अंतर्गत राज्यस्तर ते जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कम्युनिटी मेडीकल ऑफिसर, स्टाफ नर्स, टी. बी. सुपरवायजर, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, टेक्निशिअन, एएनएम, लॅब टेक्नीशिअन, फार्मासिस्ट आदी विविध पदांवर अधिकारी, कर्मचारी व परिचारिका कार्यरत आहेत.
आरोग्य सेवेत कायम असलेल्या अधिकारी, कर्मचारी इतकेच काम हे कर्मचारी करत आहेत, मात्र काम तेवढेच पण वेतनात तिपटीहून अधिक तफावत आहे. एकीकडे समान काम असताना समान वेतन मिळत नाही, त्यामुळे मानसिक खच्चीकरणही होते. तरीही सेवेत कायम होण्याच्या अपेक्षेने हे कर्मचारी मागच्या १९ वर्षांपासून आरोग्य सेवेचा भार सांभाळत आहेत. आणि लवकरच आता या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व इतर लाभ लागू होणार आहेत.
असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातून कोणी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ? पाहा संपूर्ण यादी
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन होण्याचा मार्ग मोकळा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेवेतील रिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरली जातात. मात्र, या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना तोकडे मानधन मिळते. तसेच, मागच्या १९ वर्षांपासून समायोजनाच्या आशेवर काम करणारे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादाही संपली आहे. अल्प वेतन, काम तेवढेच आणि भविष्य अधांतरी अशी स्थिती होती. मात्र, शासनाने दिनांक १४ मार्च २०२४ मध्ये काढलेल्या आदेशानुसार आता १० वर्षे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिनांक १४ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय पाहा
गुड न्यूज! आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी महत्वाचा शासन निर्णय पाहा