Earned Leave: राज्यातील अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखकरणाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्टीकरण दिले आहे, सविस्तर वाचा..
खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी संचालनालयस्तरावरून मार्गदर्शन मिळणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बुलडाणा व अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक), जिल्हा बुलडाणा यांनी विनंती केली होती, त्यानुसार आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
- महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली १९८१ नियम १६ मधील १८ (ब) नुसार फक्त माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक पूर्ण वर्षासाठी १५ दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे. मात्र खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.
- नियम १९ अन्वये कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुटीचा किंवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला/कर्मचा-याला शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी मिळवावी लागेल.
- प्राथमिक शिक्षक/मुख्याध्यापकांना दिनांक ०१.०७.१९९५ अन्वये अर्धवेतनी रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी १० दिवस मान्य केलेली आहे. तथापी, सदरील आदेशामध्ये अर्धवेतनी रजेच्या ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमूद आहे.
- महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मध्ये तरतूद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.
नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 995 जागांसाठी जाहिरात पाहा
जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक