CRT Employees Salary: पाणीपुरवठा योजनांवरील रुपांतरीत नियमित अस्थायी (CRT) आस्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षातील वेतनासाठी संबंधित जिल्हा परिषदांना निधी वितरीत करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवरील रुपातंरीत नियमित अस्थायी (CRT) आस्थापनेवरील कार्यरत पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाने दिनांक 17 नोव्हेंबर, 2022 च्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
आनंदाची बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्ता, डीए मध्ये भरघोस वाढ!
जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या रुपांतरीत नियमित अस्थायी (सीआरटी) आस्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 या अर्थिक वर्षातील नियमित मासिक वेतनासाठीवेतनासाठी यापूर्वी एकूण रु.४०५.०० लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
त्यापैकी संबंधित जिल्हा परिषदांनी आतापर्यंत केलेला खर्च विचारात घेऊन यापुढील खर्चासाठी संबंधित जिल्हा परिषदांना आता एकूण रुपये ३,६२,००,०००/- (अक्षरी रुपये तीन कोटी बासष्ट लाख फक्त) इतके अनुदान वितरीत करण्यात आला आहे.(शासन निर्णय)