Anganwadi Employees Latest News : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी दिले महत्वाचे निर्देश
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या LIC कडील प्रलंबित एकरकमी लाभा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयातील दालनात संपन्न झाली, यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर एकरकमी लाभ दिला जातो.
दिनांक १ एप्रिल २०२२ पासूनच्या प्रलंबित प्रस्तावांसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. याबाबतची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.
यावेळी महिला बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास योजने आयुक्त संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्याकडून सर्वेक्षण
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी!
अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी, पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू
अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच या कर्मचाऱ्याना ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 हजार मिनी अंगणवाडीचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याबरोबरच कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू
आरटीई' 25 टक्के लॉटरीची यादी येथे पहा
गुड न्यूज! कर्मचाऱ्यांच्या आनंतरजिल्हा बादलीचा सुधारित शासन निर्णय जारी